नवे नवखे मंत्रिमंडळ : अनेकांना आराम नवख्यांना सलाम 

फडणवीसांच्या या नव्या नवख्या मंत्रिमंडळातील एकमेव, म्हणाल तर आमदार म्हणाल तर नेता असा होता ज्याला फडणवीस मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून आपले नाव मंत्रिमडळात असल्याचे पक्के नक्की ठाऊक होते त्यामुळे ते त्यादिवसापासून आनंदात होते निश्चिन्त होते आपल्या आवडीची गाणी ऐकतांना त्यावर ठेका देखील धरत होते, नातवांना खेळवत होते आणि हे नाव आहे होते चंद्रशेखर बावनकुळे यांचे, भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्या दिवसापासून सतत धावपळ अनेक संकटे विविध आव्हाने दौरे दररोजच्या नवनवीन कटकटींना दगदगीला मनापासून कंटाळलेले पण तरीही एक नवे नवखे आव्हान पेलणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचंड यशस्वी ठरलेले बावनकुळे, त्यांना आपण मंत्री होणार आहे हे नेमके कळल्याने मनापासून सुखावले होते, कष्टाचे श्रद्धेचे चीज झाल्याने बावनकुळे नक्कीच सुखावले आहेत. काही जोडपी लग्न लवकर करतात पण साधने वापरून पण पोर उशिरा जन्माला घालतात तसे भाजपामध्ये अमुक एखादा निर्णय झटपट एकाच झटक्यात घेतल्या जात नसला तरी बावनकुळे पुढल्या काही काही महिन्यात प्रदेशाध्यक्ष पदावरून सन्मानपूर्वक पायउतार होणार आहेत.टॉपमोस्ट देवेंद्र फडणवीसांनंतर भाजपात प्रदेशाध्यक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे असते अर्थात या पदावर देखील सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे संजय कुटे पद्धतीच्या काही नेत्यांचा डोळा असला तरीही पुढल्या काही महिन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष मंत्री न करण्यात आलेले रवींद्र चव्हाण असतील होतील…

चव्हाणांविषयी पसरविण्यात आलेली कुठलीही अफवा त्यावर विश्वास ठेवणे नको, त्यांच्या सभोवताली विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यात अगदी सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेले हे कंत्राटदार कम पत्रकार सतीश धारप यांचा सततचा वावर असल्याने त्यांना जेव्हा केव्हा रवींद्र चव्हाण मंत्रीमंडळात असतांना प्रति रवींद्र चव्हाण हा दर्जा हि ओळख दिली गेल्याने किंवा त्यांचे महत्व अगदी उघड स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच उगाच वाढविल्याने, विशेषतः सतीश धारप यांची चव्हाणांच्या खात्यांमध्ये कामकाजामध्ये सततची ढवळाढवळ दादागिरी असल्याने वाढल्याने तसे नेमके पुरावे थेट अमित शाह यांना सतत सांगितल्या पाठविल्या गेल्याने यावेळी फडणवीस यांचे उजवे हात असूनही त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान दिल्या गेले नाही, या बातमीला कदाचित तसा फारसा अर्थ नसावा म्हणजे सतीश धारप यांची दहशत त्यांचा शासकीय कामकाजात सततचा सहभाग त्यावर आमदारांच्या तक्रारीतून मोठे तथ्य आहे असू शकते पण सतीश धारप यांच्यामुळे रवींद्र चव्हाण यांचे मंत्रिपद हुकले त्यात फारसे तथ्य नाही याउलट नेमके सत्य असे,चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन यांच्या तोडीस तोड जर भाजपाच्या जडणघडणीत कुठल्याही महत्वाच्या निवडणुकांमध्ये ओढवणार्या संकटात त्या देवेंद्र फडणवीसांना मनापासून सहकार्य करीत विधानसभा निवडणुकीत विशेषतः ठाणे जिल्हा आणि अख्या कोकणात फार मोठे सहकार्य केले ते एकमेव रवींद्र चव्हाण यांनी किंबहुना त्यांची पक्ष संघटनेत आणि पक्ष बांधणीत हातून घडलेली अमोल कामगिरी त्यावर विशेषतः मोदी शाह आणि फडणवीस मनापासून खुश झाले आणि त्यांनी चव्हाण यांना बावनकुळे नंतर प्रदेशाध्यक्ष कारण्याचे नक्की केले आहे. चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातून उत्कृष्ट कामगिरीतून अनेक वर्षानंतर शिवसेनेऐवजी भाजपाचे कोकणात वाढलेले महत्व त्याचे श्रेय अगदी कौतुकाने कधी उघड उघड फडणवीसांनी त्या रवींद्र चव्हाण यांना दिल्याने त्यांचे भाजपा प्रदेश अध्यक्षपद जवळपास नक्की करण्यात आले आहे…

क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी

Mon Dec 16 , 2024
कन्हान :- संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा व्दारे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण व अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संत संताजी जगनाडे चौक नागपुर येथे संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा व्दारे संत संताजी जगनाडे महा राजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!