– रासायनिक तंत्रशास्त्र विभागाचे आयोजन
अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील रासायनिक तंत्रशास्त्र विभागाच्यावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 सप्ताहाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. बी. मराठे, विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक उपस्थित होते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, योग्य शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देणे जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड आणि अभिरुचीनुसार अभ्यासक्रम, विषय कसे निवडता येतील याबद्दल पाँवर पाँईट सादरीकरणाव्दारे विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन डॉ.ए.बी. मराठे यांनी पटवून दिले.
विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्राचीन भारतात दुर्लक्षित अनेक घटनांचा गोषवारा देऊन त्या घटनांचे आज कशाप्रकारे सर्व जग अनुकरण करीत आहे याचे सुंदर उदाहरण प्रस्तुत केले. व्याख्यानाला डॉ. एन. बी. सेलूकर, डॉ. एम. बी. कुंभारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रशांत शिंगवेकर यांनी, तर आभारप्रदर्शन चैत्यन्य संतोषवार या विद्यार्थ्यांने केले.