पाकिस्तानातून आलेल्या दिल्लीस्थित महिला निर्वासितांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना बांधली राखी

– रक्षाबंधनानिमित्त पीयूष गोयल यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या महिला लाभार्थी नागरिकांची घेतली भेट

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होण्यास मदत : पीयूष गोयल

नवी दिल्‍ली :- पाकिस्तानातून आलेल्या दिल्लीस्थित निर्वासित महिलांनी आज रक्षाबंधनानिमित्त केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना राखी बांधली.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी साध्वी ऋतंबरा आणि ब्रह्माकुमारी भगिनींसोबतही रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी बोलताना मंत्री गोयल म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए)अंतर्गत राष्ट्रीयत्व प्राप्त केलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व कायदा, सुरक्षा प्रदान करेल.

“नागरिकत्व (सुधारणा) कायद्याने तुमचा अधिकार असलेला आदर आणि सुरक्षितता प्रदान केली आहे”, असे सांगून ते म्हणाले, हे रक्षाबंधन माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम उत्सवांपैकी एक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे या सर्व बहिणींना सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळू शकले आहे, असे गोयल यांनी सांगितले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“…तर मी राजीनामा देईन आणि निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Mon Aug 19 , 2024
नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अनेक मराठा आंदोलनकर्ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केले आहे. “एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com