संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या शेवटचे प्लेटफॉर्म लाईन नं 2 जवळ एक अनोळखी इसम धावत्या रेल्वेगाडीतून खाली पडल्याने मृतावस्थेत आढळल्याची घटना 30 नोव्हेंबर च्या रात्री दीड दरम्यान उघडकीस आली असून पोलिसांनी सदर घटनेची नोंद करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.
मृतकाची ओळख अजूनही पटलेली नसून मृतक अनोळखी असून वय अंदाजे 40 वर्षे, उंची पाच फूट पाच इंच,बांधा सळपातळ, रंग गोरा,केस काळे,दाढी वाढलेली,अंगात पिवळ्या रंगाचा फुल बाह्यचा शर्ट ज्याच्या कॉलर वर the original असे लिहिलेले आहे तर काळ्या रंगाचा फुल पॅन्ट आहे.उपरोक्त नमूद वर्णनाचा इसम ओळखीचा पटल्यास रेल्वे स्टेशन पोलीस चौकी कामठी तसेच इतवारी लोहमार्ग पोलीस कर्मचारी तपासी अधिकारी भगवान जैस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.