संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 8 – स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन समोर भुकेच्या व्याकुळतेसह पावसामुळे झालेल्या थंडीच्या कडाक्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 8 दरम्यान उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्याम वारंगे सह इतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.यासंदर्भात पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाची अजूनही ओळख पटलेली नाही.मृतकाची वय अंदाजे 50 वर्षे जवळपास आहे तर मृतकाच्या अंगात लुंगी व कुर्ती परिधान असून डोक्यावर टोपी तसेच काळ्या पांढऱ्या रंगाची दाढी वाढलेली आहे. सदर उपरोक्त नमूद वर्णनाचा ओळखीचा असल्यास नवीन कामठी पोलीस स्टेशन ला संपर्क साधण्याचे आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे व पोलीस उपनीरीक्षक श्याम वारंगे यांनी केले आहे.