इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा

इराण :- इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरने अजरबैजानमधून परतत होते. त्याचवेळी त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. १७ तास उलटल्यानंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडलं आहे. हेलिकॉप्टर जळून खाक झालं आहे. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. या अपघातात रईसी यांच्यासह कुणीही वाचलेलंं नाही.. रेड क्रिसेंटने याबाबतची माहिती दिलेली नाही. एक ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये हेलिकॉप्टर प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं आहे. आता अध्यक्ष रईसी यांच्यासह इतरांचा शोध घेतला जात होता. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

इराण च्या प्रेस टीव्हीने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली आहे. त्यांना त्या ठिकाणी कुणीही जिवंत असल्याचं आढळून आलेलं नाही. अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर्स होती. ज्यातली दोन सुखरुप परतली. मात्र इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियन ज्यामध्ये होते ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि मोठा अपघात झाला. १६ तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. आता या पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले आहेत. या घटनेत इब्राहीम रईसींसह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे.

इब्राहीम रईसींचा परिचय

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात १९६० मध्ये झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. धर्म आणि राजकारण हे रईसी यांचे आवडते विषय आहेत. महाविद्यालयीन आयुष्यापासूनच त्यांनी आंदोलनांमध्ये आणि विविध चळवळींमध्ये भाग घेतला.

इराणच्या न्याय व्यवस्थेत काम, वादग्रस्त निर्णयांमध्ये सहभाग

इब्राहिम रईसींनी इराणच्या न्याय व्यवस्थेत काम केलं आहे. तसंच अनेक वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतले आहेत. १९८८ मध्ये इराणच्या कैद्यांना सामूहिक फाशी देण्यात आली. या निर्णय प्रक्रियेत रईसी सहभागी होते.

या सामूहिक फाशीच्या शिक्षेत कमीत कमी ५ हजार कैद्यांना फाशी देण्यात आली अशी माहिती आंतराराष्ट्रीय मानवाधिकार संघाने दिली आहे. ही शिक्षा सुनावणारा जो आयोग होता त्या आयोगाचे एक सदस्य रईसी होते.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शरद पवार यांचे 5 सर्वात मोठे गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होणार?

Mon May 20 , 2024
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत आला होता का? या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com