चालत्या रेल्वे गाडीतुन पडुन युवकाचा मुत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- मामा भासा गोदिया वरून परत घरी काटोल करिता विदर्भ एक्सप्रेस रेल्वे गाडीने येत असताना भासा मनोज भलावी हा चाचेर ते सालवा रेल्वे स्टेशन च्या मध्ये गागनेर शिवारात पडुन मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसानी मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे.

रमेश शंकर उईके वय ३८ वर्ष रा. बोरडोह पोस्ट ढवळापुर ता. काटोल जि. नागपुर हे त्यांचा भासा मनोज बीरन भलावी वय २५ वर्ष रा. मच्छी मार्केट काटोल यांचे सोबत दोघेही (दि.१) मे २०२४ ला सका ळी ८ वाजता सासु उमाबाई बाबुलाल नारनवरे रा. खातीया जि. गोंदीया यांनी बोलविल्याने त्याचे कडे गेले होते. तेव्हा सासुकडे त्यांचा शागील भाऊ तेजस राजु शेठ वय ३७ वर्ष रा. अहमदाबाद गुजरात हा तेथे मागील तीन महीन्यापासुन आला होता. तेथे मामा रमेश व भासा मनोज यानी मुक्काम करून गुरूवार (दि.२) मे ला दुपारी २ वाजचे सुमारास विदर्भ एक्सप्रेस रेल्वे गाडीत बसुन परत काटोल गावी येण्यास निघा ले, तेव्हा सोबत शागील तेजस शेठ हा सुध्दा अहमदाबादला जाण्यासाठी सोबत रेल्वे गाडीत होता. जनरलचे तिकीट काढल्याने तिघेही जनरल डब्यात बसले होते. तेव्हा भासा मनोज ने मामा मी थोडा खर्रा थुकुन येतो असे बोलुन गेला आणि खर्रा थुंकुन तो तिकडेच बसला. काही वेळाने अंदाजे ४ वाजता रमेश ला डब्यातील लोकांनी आवाज देऊन सांगितले की तुम्हारा बंदा गिर गया तुम चैन खिचो. तेव्हा त्याला काहीही सुचले नसल्याने तेथील लोकांनी सालवा व चाचेर च्या मध्ये गांगनेर ला पडला असे सांगितले. तेव्हा समोरचा स्टेशनवर उतरून तेथिल रेल्वे पोलीसांना सांगुन त्यांनी विचारपुस करुन मला आणि माझे शागील भाऊ यास कन्हान पोस्टे येथे आणुन तेथील पोलीसांच्या मदतीने माझा भासा ला पाहण्यास गेलो तर भासा मला गांगनेर शिवारात रेलवे पटरीचा बाजु ला असेलेल्या खांबावर पडलेला दिसला असुन त्याचा कमरेला खांबाचा मार लागल्याने गड्डा पडुन गंभीर जख्मी होऊन तो मरण पावला होता. तेव्हा तेथे पाह णी केली तर तो खांब क्र.११०३ मध्ये दोन खांब २७ ते २९ च्या मध्ये पडलेला होता.

गुरूवार (दि.२) मे ला सायंकाळी ४ वाजता दरम्यान मामा रमेश, भासा मनोज व शागील भाऊ तेजस असे तिघे विदर्भ एक्सप्रेस रेल्वे गाडीने गोदीया वरून परत येतांना भासा मनोज यांचा रेल्वे गाडीतुन अचानक तोल जावुन तो बाहेर गांगनेर शिवारात रेल्वे च्या खांबावर पडुन गंभीर जख्मी होऊन मरण पावला. त्याविषयी कोणावरही कोणताही शक, संशय नाही. अश्या मामा रमेश शंकर उईके यांचे फिर्यादी वरून कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यस्तरीय पुणे खुली सैम्बो कुस्ती स्पर्धेत बीके सीपी शाळेचे उत्कृष्ट कामगिरी

Sat May 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – विजयी खेडाळुचे जल्लोषात स्वागत व अभिनंदन.  – राज्यस्तरीय खुली सैम्बो कुस्ती स्पर्धेत बीकेसी पी खेडाळुनी १२ स्वर्ण,३ रजत व१ कास्य असे १६ पदक  कन्हान :- राज्यस्तरीय ओपन सैम्बो कुस्ती स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान च्या १६ विद्यार्थी खेडाळुन स्वर्ण, रजत व कास्य पदक प्राप्त करून कन्हान शहरा त पदार्पण करताच पालकवर्गानी वाज्या गाज्या, फटा क्याची आतिषबाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com