संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढां परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने सात ते आठ तरुणांनी संगनमताने माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे यांच्यावर तलवार तसेच हॉकी ने जबर मारहाण करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात जख्मि फिर्यादी दिलीप बांडेबूचे यांनी स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सदर जख्मि माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे हे मोंढां येथील कायमस्वरूपी रहिवासी असून व्यायामशाळा चालवतात. काही दिवसांपासून परिसरात काही अवैध व्यवसायिकांचा घोळ जमाव राहत असून गांजा ,चरस पिऊन गदारोळ माजवीत असल्याने परिसरातील शांतता भंग होत असल्याची तक्रार करण्याहेतू माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे यांनी पुढाकार घेऊन वस्तीतील नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन पोलीस स्टेशन ला तक्रार देण्याच्या बेतात असल्याची कुणकूण लागताच येथील अवैध व्यवसायिकांनी वाद घातला होता या वादाचा राग मनात घेऊन वादाचा वचपा काढण्याच्या राग मनात धरून काल रात्री जिम बंद करून घरी परत येत असलेल्या माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे वर सात ते आठ आरोपीने संगनमताने तलवार व हॉकी ने जबर मारहाण करून जख्मि केले.या हल्ल्यात माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे यांनी योग्यरीत्या सामना केल्याने स्वतःचा जीव वाचवण्यात यश गाठले.घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांनी मदतीची धाव घेत जखमीला रॉय हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.