राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका पाठविण्याकरीता 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2024 असा होता. या प्रवेशिका मागविण्याकरीता दि.29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोकण विभागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगरजिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेक लोस : शिंदे,अजित,भाजपा - उद्धव,शरद,कांग्रेस सभी असमंजस में 

Fri Feb 16 , 2024
 – अबतक शिवसेना और कांग्रेस के मध्य सीधी भिड़ंत हुआ करती थी,सेना व एनसीपी में दो फाड़ होने के कारण समीकरण बिगड़ा   नागपुर (रामटेक) :- रामटेक लोकसभा क्षेत्र वैसे कांग्रेस का गढ़ रहा है लेकिन पिछले 2 टर्म से भाजपा की मदद से शिवसेना का कब्ज़ा हैं.शिवसेना के साथ भाजपा तो कांग्रेस के साथ एनसीपी का क्रमशः युति व गठबंधन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com