संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अलीकडे आजच्या आधुनिक युगात सर्वत्र सोशल मीडियाचा ज्वर चढला आहे.त्यातच या समाजमाध्यमांचा वापर करीत असताना काही समाजहित जोपासतात तर काही समजविघातकाची भूमिका साकारताना दिसत आहेत.त्यातच आजच्या वाढत्या समाजमाध्यमांच्या वापरातून काही वयस्क व अल्पवयीन तरुण रील बनवून इन्स्ट्राग्राम सारख्या समाजमाध्यमातून आक्षेपार्ह,अश्लील तसेच जनमानसात भीती निर्माण होईल असे व्हिडीओ शेअर करण्याचे फॅड निर्माण होत असून या प्रकारच्या समाजमाध्यमातून समाजविघातक कृत्याचा जणू काही परवाना मिळाला की कांय या वर्तणुकीला बळ मिळत असल्याचे लक्षात येताच तेव्हा समाजमाध्यमातून अशा प्रकारच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर लक्ष वेधून घेत कायदेशीर कार्यवाही करण्याहेतु सायबर पथकाच्या मदतीने ‘गरूडदृष्टी’नावाचा समाजमाध्यम निगराणी उपक्रम पोलिस विभागाकडून सुरू करण्यात आला आहे.त्यानुसार आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची करडी नजर असणार आहे.तेव्हा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांनो सावधान…
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर डीसीपी निकेतन कदम यांची ‘गरुडदृष्टी ‘आहे.
शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंघल यांच्या नेतृत्वात परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ सायबर पथकाच्या माध्यमातून ‘गरूडदृष्टी”उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.या उपक्रमा अंतर्गत नवीन कामठी,जुनी कामठी,कपिल नगर पोलीस स्टेशन आदी ठिकाणी आतापर्यंत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 20 जनावर नुकतेच कायदेशीर कार्यवाही करण्यात आली त्यात अल्पवयीनाला ताब्यात घेत त्याच्या आई वडिलांना समज देऊन सुचनापत्र देण्यात आले तसेच वयाधीन तरुणांना पोलीस स्टेशन ला बोलावून त्याच समाजमाध्यमावर माफीनामा मागून या प्रकारचे व्हिडीओ शेअर न करण्याची विंनती करण्यात आली.या गरूडदृष्टी उपक्रमाच्या माध्यमातुन आक्षेपार्ह,अश्लील तसेच जनमानसात भीती निर्माण करणारे व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.तसेच व्हिडीओ अपलोड करणारा जर अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांना बोलावुन लक्षवेधी सुचनापत्र देऊन सोडण्यात येत आहे तसेच त्या मुलाचे समुपदेशन करून त्याना जवाबदार भारतीय नागरिकत्वाची जाणीव करून देण्यात येते तसेच व्हिडीओ अपलोड करणारा जर 18 वर्षापेक्षा अधिक असेल तर अशांना त्याच्या व्हिडीओ वरील कृतीचे अवलोकन करून कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.याव्यतिरिक्त त्याच्याकडून भविष्यात असे कृती होणार नाही याची हमी घेण्यात येत आहे.परिणामी समाज माध्यमांचा वापर करताना याप्रकारचे आक्षेपार्ह, अश्लील, व्हिडीओ पोस्ट करणे टाळावे असे आवाहन पोलिस विभागाकडून डीसीपी निकेतन कदम यांनी केले आहे.