संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या पिवळी नदी बस स्टॉप जवळ अवैधरित्या एम डी बाळगणाऱ्या दोन एम डी तस्करबाजास अटक करण्यात डी सी पी पाच पथकाला काल सायंकाळी साडे सात दरम्यान यशप्राप्त झाले असून या धाडीतून 3.50ग्राम मेफेड्रोन ड्रग्स , दोन महागडे मोबाईल,एक दुचाकी असा एकूण 1 लक्ष 2 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपिचे नावे सद्दाम हुसेन अब्दुल मन्नान कुरेशी वय 26 वर्षे रा कामगार नगर,आकाश दहाट वय 23 वर्षे रा नया नगर कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ डीसीपी पाच चे प्रमुख एपीआय जितेंद्र ठाकूर,प्रभारी पोलीस निरीक्षक आकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव,तसेच अंकुश गजभिये,योगेश ताथोड,रवी शाहू,अरुण चांदणे,आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.