धम्म रॅली ने भिक्कु संघाचे स्वागत!
दवलामेटी :- अमरावती मार्ग दवलामेटी आठवा मैल रामजी आंबेडकर नगर स्थित तक्षशिला बुद्ध विहार येथे गुरुवारी 3 महिन्यापासून जारी वर्षावास कार्यक्रमाचा समापन उत्साहात व विविध उपक्रमाने सम्पन्न करण्यात आला.
या निमित्य बुद्ध विहार समिती व अनुयायायांनी विहार परिसराला रोषणाई,पंचशील ध्वज, रांगोळी,ने आकर्षक पद्धतीने सजविले होते. सकाळी नागपूर जिल्ह्यातील विविध विहारातून निमंत्रित असंख्य भन्तेगणाला सम्राट अशोक बुद्ध विहारापासून तर तक्षशिला बुद्धविहारा पर्यंत धम्मरॅलीद्वारे व फुलाच्या वर्षावात आगमन झाले. या ठिकाणी भन्ते प्रियदर्शी महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन सामूहिक धम्म वंदना ग्रहण करण्यात आली. वर्षावासाचे प्रमुख भन्ते भदंत तन्हकर थेरो यांचे उपस्थित परित्रान पाठ करून उपसकाना तथागताचे विचार, सुखी जीवन जगण्याचा मार्ग, पंचशीलाचा अर्थ व पालन याचे महत्व पटवून दिले. आयोजक बुद्ध विहार समिती व पदाधिकारी नितीन ढोके, दिगंबर जांबुळकर, अंबादास इंगळे, व्यंकट इंगळे, सतीश बोबडे, संदीप सुखदेवे, सुभाष गडपाल, मिलिंद पाटिल यांच्या वतीने उपस्थित भिक्कु संघास भोजनदान व नंतर चिव्हर व धम्मदान देण्यात आले. उपस्थित भन्ते प्रियदर्शी महाथेरो, कुशल चित, शिलपंथ महाथेरो,भिक्षुनी आर्याजी यांनी मोठ्या संख्येने सहभागी उपासक -उपसकाना बुद्ध धम्म शांती, अहिंसा व वैज्ञानिक विचारावर आधारित असून चमत्कार विरहित आहे. चिंता मुक्त व प्रगतिशील जीवना साठी समाज व देशाला बुद्ध धम्माची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमा चे प्रमुख आयोजक व उपासिका चैत्रा पाटील, ज्योती शिंगारे, क्षमा गडपाल, चंदा बोबडे, श्वेता सुखदेवे, बारमाटे, इंगळे व नलिनी लाममसोंगे यांच्या क्रियाशीलतेने शेवटी उपस्थित उपासक व परिसरातील नागरिकांना भोजन दान देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शलेंद्र लामसोंगे व आभार नरेश बारमाटे यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी बुद्ध विहार समिती पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र धारण करून उपासक -उपासिका सहभागी झाले होते.