नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलीस दलातील एकुण ०६ दामिनी पथक कार्यरत असुन दामिनी पथकाकडुन बालक तसेच विद्यार्थी सुरक्षेसंबंधी धडे देण्यात येतात. यामध्ये विद्यार्थ्यांना गुड टच बँड टच कोणकोणते आमिश दाखवुन बालकाचा व विदयाध्यर्थ्यांचे शोषण केले जाते. तसेच यासारखे कृत्य कोणासोबत पडल्यास त्या संबंधी माहिती देण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात येते. पोस्टे काटोल येथील दामिनी पथकाकडुन नाबीरा कॉलेज काटोल, पंढरीनाथ आर्टस अँड सायन्स कॉलेज नरखेड, मुंडाफळे कॉलेज नरखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले. तसेच पोस्टे पारशिवनी अंतर्गत निर्भया पथक कार्यवाही अंतर्गत पारशीवणी येथे हरिहर विद्यालय ला भेट देऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले, पोस्टे कळमेश्वर येथील दामिनी पथकाने बस स्टैंड अॅड नगर परीषद माध्यमिक शाळा कळमेश्वर येथे भेट देवुन विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत दामिनी पथक द्वारे पोस्ट हद्दीतील धर्मराज विद्यालय, दखणे हायस्कूल, विकास विद्यालय इत्यादी शाळांना भेट देण्यात येत असून दामिनी पथकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
पोस्टे चुट्टीबोरी अंतर्गत महिला पोलीस उपनिरीक्षक कुमुदीनी पाथोडे यांनी सावित्रीबाई फुले कनिष्ठ विद्यालय बुट्टीबोरी येथे भेट देऊन crime against women and self difference बाबत ११ व्या वर्गाला माहिती दिली, तसेच dial ११२ बाबत विदयार्थ्यांना माहिती दिली. तसेच सरस्वती विद्यालय बुट्टीबोरी येथे भेट देऊन १० वी च्या विद्यार्थ्यांयांना eve teasing n law according या बाबत माहिती दिली. पोलिस स्टेशन खापरखेडा हद्दीत कार्यरत दामिनी पथकामध्ये एक अधिकारी २ महिला अंमलदार असे कार्यरत असून सदर पथकातील अधिकारी अंमलदार हे पोस्ट हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयात भेट देऊन त्यांना नवीन कायद्याविषयी माहिती दिली. त्याच्यां मधे कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. तसेच शाळा सुटण्याची वेळेत पेट्रोलिंग करून महाराष्ट्र स्कूल खापरखेडा, शंकरराव चव्हाण स्कूल तसेच इतर शाळांमधे कार्यक्रम घेण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील आणि विशेषता मौदा शहरातील महिला व मुलीच्या सुरखे करिता पोलीस स्टेशन तर्फे दररोज दामिनी पथकाची नेमणूक करण्यात येते. या पथकातील महिला अंमलदार या दररोज शहरातील गर्दीचे ठिकाण जसे बस स्टॉप, महाविद्यालय, शाळा, कोचिंग क्लासेस, बाजारपेठ व मुख्य रस्ता इत्यादी ठिकाणी तेथील महिला व मुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांचेशी संवाद साधण्यात येतो. टवाळखोर व मवाली लोकांना न घाबरता त्यांच्याविषयी पोलिसांना माहिती देण्यावावत व आवश्यकते नुसार डायल ११२ वर तक्रार करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात येतात. विज्युअल पोलीसिंग च्या मार्फतीने सर्वसामान्य महिलां व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व अप्रिय घटना टाळता यावी हा यामागील उद्देश असतो. आज रोजी दामिनी पथकाने मौदा येथील तिडके महाविद्यालय, जनता हायस्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी साई पब्लिक स्कूल, ज्ञानगंगा कॉन्व्हेंट शाळांना भेटी देवुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.