नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आधार व बँकखाते तलाठ्याकडे जमा करावे – जिल्हा प्रशासन

नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधि‍त शेतकऱ्यांनी आधार व बँक खाते क्रमांक तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप पारदर्शकरित्या आणि जलद व्हावे. याकरिता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन प्रणाली महा-आयटी कंपनीमार्फत विकसित करण्यात येत आहे. त्याकरिता सर्व तहसीलदार व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी लॉग इन आयडी देण्यात येणार असून तहसीलदार यांनी त्या प्रणालीमध्ये शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीसाठी लाभार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. सदर भरावयाच्या माहिती मध्ये बाधित शेतकऱ्यांकडून त्यांचा आधार क्रमांक व बँक खात्याच्या खाते क्रमांकाची आवश्यक आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधि‍त शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक तात्काळ आपल्या साझ्याच्या तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा फुले शिक्षण संस्थेत माळी समाजाचा राज्यस्तरीय उपवर वर-वधू परिचय मेळावा संपन्न

Mon Dec 26 , 2022
नागपूर :-महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथे रविवार दि 25 डिसेंबर 2022 ला सर्व शाखीय माळी समाजाचा राज्यस्तरीय भव्य उपवर वर – वधू परिचय मेळावा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार तसेच प्रमुख वक्ता म्हणून प्रशांत वावगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महाज्योती, नागपूर, प्रमुख उपस्थिती  डॉ राजूभाऊ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com