दखणे हायस्कुल चा शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत बळीराम दखने हायस्कुल कन्हानच्या विद्यार्थी खेडाळुनी खो-खो वयोगट १७ मुले व वयोगट १४ मुले स्पर्धेत विजय प्राप्त केला. वयोगट १७ मुली च्या स्पर्धेत तालुक्यातुन विजय प्राप्त करून जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. तसेच १४ वयोगटात कुस्ती स्पर्धेत प्रियंका कोठेकर हीने विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागा च्या विद्यमाने तथा जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषद च्या वतीने सन २०२२-२३ या सत्रातील शालेय तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा पारशिवनी येथील हरिहर विद्यालय पारशिवनी येथे आयोजित करण्यात आल्या असुन यात शालेय खो-खो स्पर्धेत बळीरामजी दखणे हायस्कुल कन्हान चे विद्यार्थी खेडाळु मुले १७ वयोगटात केसरीमल हायस्कुल व लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या संघा ला पछाडनी देत नेहमी प्रमाणे आ पला दबदबा कायम ठेवला. मुले १४ वयोगटात अंतिम सामन्यात हरिअर विद्यालयाच्या संघावर विजय मिळ वित बळीरामजी दखणे हायस्कुलने आपले वर्चस्व नेहमी प्रमाणे कायम ठेवले. तसेच मुली १७ वयोगटात ही दखणे हायस्कुलच्या मुलींनी बाजी मारून काटोल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्याच बरोबर शालेय कुस्ती स्पर्धेत बळीराम दखणे हायस्कुल च्या मुली १४ वयो गटात प्रियंका कोठेकर ने बाजी मारून नागपुर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. बळीरामजी दखणे हायस्कुल च्या प्राचार्या  विशाखा ठमके हयांनी सर्व विजयी खेळाडुचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता खेळाडुंना व शाळेचे क्रिडा शिक्षक माधव केवलरामजी काठोके  यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यकत केले. या स्पर्धेला उपस्थित असलेले शिक्षक विलास, अमित थटेरे , गवळी ,  मोटघरे ,  कोहळे ,  गणवीर,  अनिकेत वैद्य, निखिल हयांना शुभेच्छा देऊन सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा रामटेक मंडळातर्फे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

Sun Nov 20 , 2022
रामटेक :-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून सावरकरांचा व हिंदु प्रेमीचा अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यविरोधात “निषेध आंदोलन” रामटेक भाजपा मंडळातर्फे तर्फे शितलवाडी T- Point येथे करण्यात आले आंदोलनाला जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय मुलमुले,जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे,BJYM जिल्हा महामंत्री राहुल किरपान जिल्हा ग्रामविकास आघाडी अध्यक्ष राजेश ठाकरे,तालुका भाजपा महामंत्री चरण सिंग यादव,राजेश जयस्वाल,नंदकिशोर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com