नागपुरातील सर्वात भव्य अश्या दहीहंडी २०२४ दक्षिण नागपूर भाजयुमो व आ. मोहन मते मित्र परिवार तर्फे संपन्न !!!!!

विशेष आकर्षण सेलिब्रिटी श्रेयस तळपदे व मुग्धा गोडसे ह्यांची उपस्तिथी.

नागपूर – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य दरवर्षी प्रमाणे नागपूरातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे भाजयुमो दक्षिण नागपूर व आमदार मोहन मते मित्र परिवारातर्फे छोटा ताजबाग स्क्वेयर येथे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमास प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी , दक्षिण नागपूरचे आ. मोहन मते , मध्यप्रदेश कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय , अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री मुग्धा गोडसे , मध्य नागपूर आमदार विकास कुंभारे उपस्थित होते.

अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या ह्या दहीहंडी उत्सवात विविध कार्यक्रमांची मांदीयाळी व कार्यक्रमांत सहभाग घेण्यासाठी नागरिकांची रेलचेल पाहायला मिळाली.

वेशभूषा स्पर्धा , इन्स्टाग्राम रिलस्टर स्पर्धा अश्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांचा उत्साह शिगेला होता. नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला व बक्षीस वितरण सोहळ्याला आ. मोहन मते ह्यांनी संबोधित केले व स्पर्धेत भाग घेतलेल्या दहीहंडी स्पर्धकांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आ. मोहन मते ह्यांनी भाजयुमो दक्षिण नागपूर अध्यक्ष कुलदीप माटे व संपूर्ण युवा मोर्चा टीम चे विशेष कौतुक केले.

भाजयुमो दक्षिण नागपूर अध्यक्ष कुलदीप विमल शामराव माटे ह्यांनी सहकार्य लाभलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच ऑरिअस हॉस्पिटल, नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, एम ढोमणे ज्वेलर्स, ए.जी एन्व्हायरो, द्वारका ग्रुप, ऐस.जी इन्फ्रा, 4 आयकॉन, सिद्धी कॉस्मेटिक ह्यांचे विशेष आभार व्यक्त केले . या कार्यक्रमास बादल राऊत (भाजयुमो शहराध्यक्ष नागपूर), विजय आसोले, (भाजपा अध्यक्ष दक्षिण मंडळ) सौ.ज्योती देवघरे , (भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष दक्षिण मंडळ) उपस्थित होते .

तसेच प्रदेश सचिव अमर धरमारे , पालक आकाश विठ्ठल भेदे , आशिष मोहिते, केतन साठवणे , नयन पिसे , सुरज कावरे, अक्षय खराबे, उदय ढोमणे, हर्षल दहिकर, तुषार वानखेडे , अभिषेक कोठे, अक्षय कडीखाये,अमित शहाणे, आकाश मिश्रा, प्रणय फुलझले, अक्षय कुंभारे, सायली उपासे,अक्षय ठाकरे, अर्पित मलघाटे, मयूर इंगोले, प्रसाद हडप, आर्यन इंगळे, तसेच भाजयुमो नागपूर शहर पदाधिकारी, दक्षिण नागपूर मंडळ पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष , संयोजक आणि कार्यकर्ते ह्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल अध्यक्ष कुलदीप माटे ह्यांनी आभार व्यक्त केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज आगमन

Sat Aug 31 , 2024
Ø ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कार्यक्रमाला उपस्थिती नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता शासकीय विमानाने आगमन होईल. विमानतळावरुन रेशीमबागकडे प्रयाण करतील. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत रेशीमबाग येथे आयोजित ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या कार्यक्रमासाठी दुपारी २ वाजता आगमन होईल. कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ वाजता विमानतळासाठी प्रयान करतील. सायंकाळी ४.३० वाजता येथून शासकीय विमानाने मुंबईसाठी प्रयाण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!