संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5 :- कामठी शहरात सध्या तीन सीटर ऑटोचालकाचा बेशिस्तपणा तसेच मनमानी कारभार वाढल्याने कामठीवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत.परंतु स्थानिक वाहतूक पोलिसांचे या बेशिस्त ऑटोचालकाशी मधुर संबंध असल्याने वाहतूक पोलिसाचा अभयपणा निर्माण झाला आहे . ऑटोचालक नियमांना बगल देत वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर ऑटो नियमबाह्य पद्ध्तीने भरधाव पळवितात .ऑटोचालक वाहतूक नियमांची पूर्णपणे ऐसितैसी करीत आहेत.प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत कुठेही ऑटो थांबवित असल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.असाच एक प्रकार काल 4 नोव्हेंबर ला सायंकाळी 7 दरम्यान कामठी बस स्थानक कडे सायकल ने फिरायला जात असलेल्या चंद्रमनी नगर रहिवासी खुशाल मेश्राम या 61 वर्षीय इसमाला एका तीन सीटर ऑटो चालकांने जोरदार दिलेल्या धडकेतून घडलेल्या अपघातात सायकलस्वार गंभीर जख्मि झाले व ऑटोचालकाने घटनास्थळाहून पळ काढला.सुदैवाने जीवितहानी टळली असून नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात उपचार घेत आहे. यासंदर्भात जख्मि फिर्यादी खुशाल मेश्राम ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .तरीसुद्धा वाहतूक पोलीस धृतराष्ट्राची भूमिका घेत असल्याने अश्या बेशिस्त ऑटो चालकांचा मनमानी कारभार अजूनही कायम असल्याने कुणाची अपघाती जीवितहानी होईल तेव्हा या बेशिस्त ऑटोचालकांना कायद्याचा वचपा कळेल का?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत आहेत