गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी

गडचिरोली :- जिल्ह्यात दिनांक 02 डिसेंबर ते 08 डिसेंबर 2024 या कालावधीत पी.एल.जी.ए. नक्षल सप्ताहाचे आयोजन तसेच दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांनी संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 11 डिसेंबर 2024 चे मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे.

सदर कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

30 नवंबर को सनातन संस्था का रजत जयंती समारोह

Fri Nov 29 , 2024
– कार्यक्रम में प.पू. गोविंददेव गिरि महाराज का मुख्यमंत्री के हाथों अमृत महोत्सव सम्मान होगा।  पणजी :- गोवा राज्य में स्थापित और वर्तमान में पूरे भारत में सनातन हिंदू धर्म का प्रचार-प्रसार करने वाली सनातन संस्था का रजत जयंती समारोह 30 नवंबर को आयोजित किया गया है। इस अवसर पर श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास के कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com