संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी नगर परिषद तर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
कामठी :- आपल्या भारतीय संस्कृतीत ग्रामीण व शहरी भागात मकरसंक्रांतीचे, हळदी कुंकू कार्यक्रमाचे विशेष महत्व आहे.तेव्हा आजच्या या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी तीळगुळाच्या गोडव्या प्रमाणे परस्पर स्नेहसंबंध वाढविण्यावर भर दिला पाहिजे .महिला शक्तीला अधिक जागृत आणि सक्षम करण्यासाठी एकजुटीने काम केले पाहिजे असे मौलिक प्रतिपादन जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस उपनिरीक्षक मीना झाडे यांनी आज कामठी नगर परिषद तर्फे आयोजित हळदी कुंकू व महिला उत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी महिलांसाठी उखाणे,महिला समूहनृत्य आणि विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी संदीप बोरकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद अधिकारी विक्रम चव्हाण, प्रदीप भोकरे,रुपेश जैस्वाल, विजय मेथीयां, माजी नगरसेवक लालसिंग यादव तसेच ऍड भीमा बोरकर,माजी नगरसेविका वैशाली मानवटकर,माजी नगरसेविका ममता कांबळे, माजी नगरसेविका पिंकी रमेश वैद्य, माजी नगरसेविका हर्षा मंगेश यादव, माजी नगरसेविका रमाताई गजभिये, माजी नगरसेविका मंदा चिमनकर,माजी नगरसेविका स्नेहलता गजभिये ,महिला पोलीस कर्मचारी माया अमृ आदी उपस्थित होते.याप्रसंगी सर्वान भेटवस्तू वाण देऊन स्नेहभोजना सोबत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.