पीक विम्यासाठी सीएससी चालकांना एक रुपयापेक्षा जास्त रक्कम देऊ नये

– तक्रार नोंदसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

गडचिरोली :- राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रूपयात पीक विमा योजना मागील वर्षीपासून अंमलात आणली आहे. यासंबंधीचे अर्ज भरतांना काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) केंद्र चालक हे विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रती अर्ज रुपये एक पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. एक रूपायापेक्षा अधिक रकम घेणाऱ्या सीएससी केंद्राबाबत तक्रार नोंदविण्यासाठी शासनामार्फत टोल फ्री क्रमांक 14599, 14447 तसेच 011-49754923, 011-49754924 व व्हाटसअप क्रमांक 9082698142 आणि इ-मेल आयडी support@csc.gov.in उपलब्ध करून दिला आहे. तसेच तक्रार नोंद पत्रव्यवहारासाठी – सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड, युनिट नंबर 13, ग्राउंड फ्लोअर, निळकंठ कॉर्पोरेट, आयटी पार्क, किरोळा रोड, विद्या विहार (वेस्ट), मुंबई-400086 या पत्त्यावर संपर्क करावा.

जिल्ह्यातील प्रत्येक सीएससी केंद्रचालकांनीदेखील तक्रार नोंद करण्यासाठी दिलेले नंबर व पत्याचे फलक आपल्या केंद्राच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना कृषी विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. यासोबतच शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाणार आहे.

विमा योजनेमध्ये सहभागासाठी खालील पर्याय आहेत :

शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर ऑनलाईन अर्ज भरू शकतो. शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो .कर्जदार शेतकऱ्यांनी विमा मुदत संपायच्या किमान सात दिवस आधी विमा योजनेत सहभाग घ्यायचा असल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेस कळविल्यास त्या संस्थेमार्फत त्याचा विमा हप्ता जमा करुन त्यांना सहभागी करुन घेण्यात येते.

केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभाग घेऊ शकतो. सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो.

सीएससी केंद्र चालकांना प्रति शेतकरी रुपये 40 प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. हे शुल्क संबंधित विमा कंपनी ही सीएससी यांना अदा करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य शुल्क सीएससी चालक घेऊ शकत नाहीत. मात्र शेतकऱ्याने ७/१२, ८-अ स्वत: काढून दिला पाहिजे. किंवा शासकीय शुल्क भरून ऑनलाईन प्राप्त करून घ्यावा.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे ?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्‍यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र, त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्‍याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक , आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटरच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दि. १५ जुलै, २०२४ आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोडी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एल. पीतांबर बने महामंत्री

Thu Jul 4 , 2024
– साऊथ ईस्ट सेन्ट्रल रेल्वे मजदूर कांग्रेस यूनियन का 35 वी कार्यकारिणी समिति सभा संपन्न नागपुर :- मंगल मण्डप कडवी चौक, कामठी रोड़ नागपुर में साऊथ ईस्ट सेन्ट्रल रेल्वे मजदूर कांग्रेस कार्यकारिणी समिति की 35 वी कार्यकारिणी सभा संपन्न हुई । सभा में बिलासपुर, रायपुर, नागपुर मण्डल के कार्यकारिणी सदस्यों के साथ तीनों मण्डल के हजारों कार्यकर्ताओं ने भाग लिया। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com