संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20:-आगामी खरीप हँगामात यशस्वी शेती करण्याच्या दृष्टिकोनातून खरीप हंगाम सन 2022 साठी कृषि विभागातर्फे पिकनिहाय नियोजन करण्यात आले आहे .यानुसार कामठी तालुक्यात 25 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर ख़रीपाची पेरणी करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी मंजूशा राऊत यांनी दिली.
यानुसार 3 हजार 20 हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, 11 हजार 225 हेक्टर क्षेत्रात भात, 5885 हेक्टर क्षेत्रात कापूस, 100 हेक्टर क्षेत्रात मिरची, 05हेक्टर क्षेत्रात ज्वारी, 35 हेक्टर क्षेत्रात मका, 11 हजार 265 हेक्टर क्षेत्रात एकूण तृनधान्य, 1960 हेक्टर क्षेत्रात तुर, 3020 हॅकटर क्षेत्रात एकूण गळीतधान्य , एकूण2 हेक्टर क्षेत्रात मुग, 2 हेक्टर क्षेत्रात उडिद, 1125 हेक्टर क्षेत्रात उस, 250 हेक्टर क्षेत्रात फुलपिके, 1450 हेकटर क्षेत्रात भाजीपाला याप्रकारे पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 24 हजार 338 हॅकटर असून 25 हजार 157 हॅकटर क्षेत्रात पेरणी नियोजन करण्यात आले आहै.
कामठी तालुक्यातील खरीप हंगामाचे पिकनिहाय नियोजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com