संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी रहिवासी सराईत गुन्हेगार विजय उर्फ टायसन डोंगरे वय 44 वर्षे ला डीसीपी सारंग आव्हाड यांनी तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी हा नेहमी आपले साथीदारांसह राहून वस्तीत लोकांना दमदाटी दाखवणे तसेच जबरदस्तीने चोरी करने,अवैध दारू विक्री करणे,एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हे इत्यादी प्रकारचे अशे प्रकारचे भारतीय दंड संहिता मधील प्रकरणं सोळा ते सतरा अनव्ये शिक्षेस पात्र गुन्हे सवयीचा असून त्याच्यावर निर्दिष्ट केलेल्या सवयीमुळे परिसरात प्रचंड भीतीमय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावरून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले.यानुसार सदर इसमास नागपूर शहर पोलिस आयुक्तलय, नवीन कामठी पोलीस स्टेशन,तसेच पोलीस स्टेशन खापरखेडा,मौदा व कन्हान सिमेतून हद्दपार करण्यात आले.