नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हद्दीत दुर्गा नगर प्लॉट क. १४४ पारडी नागपुर, येथे राहणारे फिर्यादी सुरेश प्रमोद कुरमनकर वय २३ वर्ष यांनी त्यांची होन्डा शाईन गाडी क. एम. एच ४० एस. आर. ७६६९ काळया रंगाची किंमत्ती १०,०००/- रू ची पारडी मेडप्लस ऑफीस चे समोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीची होन्डा शाईन गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी पोलीस ठाणे पारडी येथे दिलेल्या तकारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ०५ येथील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून, सि.सी.टी.व्ही. फुटेज वरून आरोपी सोनु खान महबुब खान रा. यासीन प्लॉट मोठा ताजबाग, नागपूर यास निष्पन्न केले, आरोपीने वर नमुद चोरी केलेले वाहन मोठा ताजबाग मेला ग्राउंड येथे लावारीस स्थितीत मिळुन आले, आरोपी बाबत खात्री केली असता नमुद आरोपी हा नागपुर शहर रेल्वे पोलीस ठाणे येथील गुन्हयात अटक असून सध्या न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात बंद आहे.
वरील गुन्हा उपकीस आणण्याची कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी अंमलदार यांनी केली.