नागपुर – पोलीस स्टेशन पारडी, नागपूर शहर अपराध क्रंमाक 534/2021 कलम 379
भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हयातील फिर्यादी नामे कैलाश गणेश गजघाटे वय 45 वर्ष रा.
प्लाॅट नं 38, शिवम सोसायटी, आभा नगर, पो.स्टे पारडी, नागपूर शहर यांनी दिंनाक
12/10/2021 रोजी रात्री 10.15 वाजता आपल्या घराचे दारासमोर त्यांची मोपेड़ क्र.
MH-49-V-2588 किं.अं. रू 20,000/- ही लाॅक करून ठेवुन घरात झोपी गेले. सकाळी
06.15 वाजता मुलींना ट्याुशन ला सोडायचे असल्याने ठेवलेल्या ठिकाणी मोपेड दिसुन आली
नाही. शोध घेउन सुध्दा मोपेड मिळुन न आल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून कलम 379 भादंवि चा
गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस स्टेशन कळमेश्वर, नागपूर ग्रामीण अपराध क्रंमाक 616/2021 कलम 379
भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हयातील फिर्यादी नरेंद्र अशोकराव भुसारी वय 42 वर्ष रा.
वार्ड नं 12, कळमेश्वर यांनी दिंनाक 27/10/2021 रोजी रात्री 21.30 वाजता त्यांचे मालकीची
पांढऱ्या रंगाची एक्टीव्हा क्रं MH-40-AS-2858 किं.अं.रू 10,000/- ही आपल्या
घराचे दारासमोर उभी करून ठेवली असता दिनांक 28/10/2021 रोजी सकाळी 5.00 वाजता
ठेवलेल्या ठिकाणी मोपेड दिसुन आली नाही. फिर्यादीने शोध घेउन सुध्दा मोपेड मिळुन न आल्याने
फिर्यादीचे रिपोर्ट दिंनाक 29/10/2021 रोजी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हयाचा समांतर तपासात युनिट क्र. 5 चे पथकातील पोलीस अमलदारांना
मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे माहीतीवरून आरोपी क्र. 1) शेख रफीक शेख गुल मोहम्मद वय 32
वर्ष रा. इंदीरा माता नगर, एनआयटी मैदानचे बाजुला, नागपूर शहर, 2) राहुल उर्फ काशी रमेश
पाल वय 21 वर्ष रा. इट्टाभट्टी चैक, शहंशावली दर्गा जवळ, पोस्टे यशोधरानगर, नागपूर यांना
ताब्यात घेउन विचारपुस केली असता पाहीजे असलेला आरोपी मो.सरफराज उर्फ फैजान वल्द
सुल्तान अंसारी वय 23 वर्ष रा. गरीब नवाज नगर, पोस्टे यशोधरानगर, नागपूर याने चोरी केलेली
मोपेड ताब्यातील आरोपींतानी अनुक्रने रू 7000/- व रू 15,000/- मध्ये विकत घेतल्याचे
सांगितले. ताब्यातील आरोपीतांकडुन चोरीच्या गुन्हयातील दोन्ही मोपेड जप्त करण्यात आली. तसेच
दोन्ही गुन्हयात पाहीजे आरोपीचा शोध घेउन सुध्दा मिळुन आला नाही. करीता दोन्ही आरोपींताना व
जप्त केलेला मुद्देमालसह सबंधित पोलीस स्टेशन ला स्वाधीन करण्यात आले
सदरची कार्रवाई नागपूर शहराचे मा. पोलीस उपायुक्त(डिटेक्षन) चिन्मय पंडीत,
मा. सहा. पेालीस आयुक्त(गुन्हे) रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री मुकुंदा
सांळुखे यांच्या नेतृत्वात सपोनि विजय कसोधन, सपोनि संकेत चैधरी, पोलीस अमलदार दिपक
कारोकार, दिनेश चाफलेकर, अनिल बावणे, चंदु ठाकरे, आशिष देवरे, साईनाथ डब्बा, उत्कर्ष राउत, हिमांशु ठाकुर,नासीर शेख यांनी पार पाडली.
-दिनेश दामहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com