नागपूर :- नितीन रामदास उके, वय ४५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०३, गणेश टॉवर, भरत नगर, अंबाझरी यांनी त्यांची इटींगा चारचाकी वाहन एम. एच. ४० बि.ई. २५९५ ही बिल्डींग पार्कमध्ये लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादीचे तकारीवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी वृषभ कमल मिश्रा, वर्ग २९ वर्षे, रा. हनुमान मंदीर जवळ, टेकडीरोड, गवळीपुरा, सिताबर्डी, नागपुर यांस ताब्यात येवून विचारपुस केली असता, आरोपीने वर नमुद गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्याचे ताब्यातुन इटींगा कार क. एम. एच. ४० विई २५९५ किमती अंदाजे ७,००,०००/- रु. ची जप्त करण्यात आली. आरोपीस अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार पाहीजे आरोपी शितल चौधरी, रा. बुट्टीबोरी, नागपुर याचेसह पोलीस ठाणे अजनी हद्दीतुन एक्सेस मोपेड क्र. एम.एच.४९ बि.ए. ४३९४ किंमती अंदाजे ५०,०००/- रु. ची तसेच पोलीस ठाणे ईमामवाडा हददीतुन ये रंगाची सुझुकी एक्सेस क्र. एम.एच.४९ ए.जी. ९१५२ किंमती अंदाजे ५०,०००/- रु.ची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातून नमुद मोटार सायकली जप्ती करण्यात आल्या गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी पथकाने ०३ गुन्हे उघडकीस आणुन एकूण ८,००,०००/-रु या मुद्देमाल जप्त केलेला आहे.
वरील कामगिरी पोठपआ. डिटेक्शन, सपोआ डिटेक्शन यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल इंगोले, बलराम झाडकर, पोहवा. दिपक रिठे, नापोअ पकन हेडाऊ, कपील तांडेकर, राहुल कुसरामे, अभय दोगे यांनी केली.