शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सुविधा निर्माण करा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई :- शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी पणन विषयक सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या १५२ व्या संचालक मंडळाची सभा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. सदर बैठकीमध्ये पणन मंत्री सत्तार यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळातर्फे बापगाव, काळडोंगरी, छत्रपती संभाजीनगर तळेगाव दाभाडे तसेच सिल्लोड श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. याशिवाय काजू बोर्ड, आंबा बोर्ड, शासन अनुदानित नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे उभारण्यात येणा-या संत्रा प्रकल्पांचे कामकाज याचा आढावा घेण्यात आला. आंबा उत्पादकांसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधूरत्न योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कुलिंग व्हॅन, स्मार्ट प्रकल्पातून निर्माण करण्यात येणाऱ्या पणन विषयक सुविधा, ई-नाम योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १५ बाजार समित्यांबाबत ई- नाम योजनेनुसार पुढे करावयाची कार्यवाहीबाबत सद्यस्थितीची माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.

सिल्लोड तालुक्यातील उत्पादित होणाऱ्या मिरचीचे उत्पादन व गुणवत्ता विचारात घेऊन तेथे मिरचीसाठी सुविधा केंद्र निर्माण करावे, दोन जिल्हा मिळून पणन मंडळाचे एक उपविभागीय कार्यालय करावे, तळेगाव दाभाडे येथील प्रक्षेत्रावरील कव्हेंशन सेंटरचे काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच तळेगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल लिलाव केंद्र निर्माण करावे, अशा सूचना सत्तार त्यांनी यावेळी दिली.

सदर बैठकीस पणन मंडळाचे संचालक प्रवीण कुमार नहाटा, चरणसिंग ठाकूर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी भवेश कुमार जोशी, कार्यकारी संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जुलै पर्यंत १०० टक्के गावे हागणदारीमुक्त करावी - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Wed Jun 12 , 2024
मुंबई :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – २ चा मुख्य उद्देश संपूर्ण राज्य २०२४-२५ पर्यंत हागणदारीमुक्त करणे हा आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील ३३ हजार ९४७ गावे हागणदारी मुक्त झाली असून, ६ हजार ५२८ गावे जुलैपर्यंत हागणारी मुक्त करण्यासाठीची कार्यवाही तातडीने राबविण्यात यावी. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येणारी कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com