कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

नागपूरता. २८ :   नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (२८ जानेवारी) रोजी ६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत एम्प्रेस मॉल येथील नकक्षत्र बंकीत यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत गंजीपेठ बजेरिया येथील पांडुरंग जगरे यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. तसेच आशीनगर झोन अंतर्गत एच.बी.टाऊन विनोबाभावे नगर येथील हम लोग लॉन आणि पाटणकर चौक येथील गुज्जर लॉन यांच्याविरुद्ध लग्न समारंभात कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन २० हजार रुपयाचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

शुक्रवारी जिल्ह्यात 503 रुग्णांना डिस्चार्ज, 370 कोरोना बाधित तर 1 मृत्यू

Fri Jan 28 , 2022
एकूण डिस्चार्ज61515 एकूण पॉझिटिव्ह65033 क्रियाशील रुग्ण2381 आज मृत्यूएक एकूण मृत्यू1137 रिकव्हरी रेट94.59 टक्के मृत्यू दर01.75 आजच्या टेस्ट2730 एकूण टेस्ट525174 भंडारा, दि. 28 :  जिल्ह्यात शुक्रवारी 370 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.28) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 503 आहे. शुक्रवारी 2730 व्यक्तींची चाचणी केली असता 370 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 2381 सक्रिय रुग्ण आहे. सक्रिय असलेल्या 2381 बाधित रुग्णापैंकी 2332 रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 61515 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 65033 झाली आहे. रुग्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!