कोविड नियमांचा उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

नागपूरता. १८ :   नागपूर महानगरपालिके तर्फे मंगळवारी (१८ जानेवारी) रोजी ८ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ८० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

 उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत अचिर्व्हस एकॅडमी झाशी राणी चौक, सिताबर्डी तसेच जायका मोटर्स सिव्हील लाईन्स यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २०,००० च्या दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत जी.आर.के.कॉन्व्हेंट आराधणा नगर येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत पॉवरग्रीड चौक येथील जगत सेलिब्रेशन लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत बरडे डेव्हल्पर्स, गोधणी रोड, झिंगाबाई टाकळी येथे कारवाई करुन १० हजार रुपयाचा दंड वसूल केला.

          प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

          मंगळवारी (ता.१८) धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धंतोली येथील दर्पण सेल्स कॉटन मार्केट वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

             मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वेबचर्चेत आज जिल्हाधिकारी आर. विमला

Wed Jan 19 , 2022
 नागपूर,दि.19  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’  कार्यक्रमात जिल्हाधिकारी आर. विमला यांची  ‘स्वातंत्र्योत्तर भारत व साथरोग नियंत्रणात प्रशासनाची भूमिका’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत https://youtu.be/zw83DU23sSA या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 4  वाजता प्रसारीत होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 4 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!