विदेशात कोरोनाचा विस्फोट, जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या सावधगिरीच्या सुचना

– व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दिल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना सुचना

– कोरोना काळातील नियमांची अंमलबजावनी सुरु करण्याच्या दिल्या सुचना

रामटेक :  सध्या विदेशातील चिनसह काही देशांमध्ये कोव्हीड १९ महामारीने जणु उच्छाद घातला आहे. नवीन व्हेरियंट खुपच घातक असून त्याअनुषंगाने पूर्वतयारी म्हणुन कोरोना महामारी काळातील नियमांचा अंगीकार करणे व तसाच व्यवहार ठेवणे गरजेचे आहे. याच अणुषंगाने जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आज दि. २५ डिसेंबर ला सकाळी १० वाजताच्या सुमारास बैठक घेऊन तशा सुचना केलेल्या आहे.

झालेल्या बैठकीमध्ये एसडीओ, तहसिलदार, बिडीओ, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह तत्सम अधिकारीवर्ग उपस्थीत होता. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी उपस्थित अधिकार्‍यांना कोरोना महामारीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सतर्कतेची जनजागृती करण्याच्या सुचना केल्या. नागरीकांनी गेल्या कोरोना महामारीत जे नियम पाळलेत तेच नियम पुन्हा पाळावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरीकांना आवाहन केले आहे. त्यामध्ये दुरुन वार्तालाभ करावा, हस्तांदोलन करू नये, मास्कचा वापर करावा आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ज्या नागरीकांनी दोन लसीनंतर बुस्टर डोज घेतलेला नाही त्यांनी लगतच्या आरोग्य केंद्रात जाऊन तो अवश्य घ्यावा असे नागरीकांना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी या बैठकीद्वारे आवाहन केलेले आहे.

नागरीकांनी परिपुर्ण लसीकरण करून घ्यावे

गेल्या कोरोना महामारीदरम्यान प्रशाषकिय अधिकारी – कर्मचारी नागरीकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करवून घ्यायचे मात्र यापुढे तसे होणार नाही, प्रशाषणाने कोव्हीड १९ पासुन बचावासाठी कोणकोणत्या लस केव्हा व कशा घ्यायच्या याबाबद यापुर्वीच समजावुन दिलेले आहे. यापुढे प्रशाषण याची पुनरावृत्ती करणार नाही. तेव्हा नागरीकांनी यापुढे नजीकच्या आरोग्य केंदात जाऊन परीपुर्णरित्या लसीकरण करून घ्यावे असेही आवाहन करण्यात आलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्रदेय अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्ताने टी.बी.(क्षय रोग)मुक्त भारत जनभागीदार अभियान कार्यक्रम संपन्न

Mon Dec 26 , 2022
नागपूर :-स्व. प्रभाकरराव दटके स्मुर्ती सेवा संस्थाच्या वीतीने श्रदेय अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच टी. बी. (क्षयरोग) मुक्त भारत अभियाना अंतर्गत ८१ टी. बी. ग्रस्त रुग्णांची संस्थेने जबाबदारी स्वीकारून सलग तिसऱ्या महिन्यात एक महिना पुरावी अशी पोषक आहार किट डॉ. पारख, स्व प्रभाकरराव दटके दवाखाना मनपा महाल च्या मेडिकल ऑफीसर डॉ. सीमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!