– राज्यातील नामवंत पत्रकारांचा समावेश
– पत्रकारांच्या हितासाठी घेणार अनेक उपक्रम
मुंबई :- देशातील सर्वात आघाडीची पत्रकारांची संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्रातील कोअर टीमची घोषणा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केली आहे. या टीममध्ये राज्यातील सर्वच विभागांमधील नामवंत पत्रकारांचा समावेश केला आहे. ही टीम राज्यात अनेक उपक्रम, कृतिशील कार्यक्रम आणि संघटनेतील एकूण रूपरेषा ठरवण्यासाठी कार्यरत असणार आहे.
या कोअर टीमचे प्रमुख अनिल म्हस्के आणि बालाजी मारगुडे असतील. त्यांनी घोषित केलेले उर्वरित लीड करणारे मुख्य पदाधिकारी, प्रमुख याप्रमाणे असतील. मुंबईमधून विलास बडे, फराह खान,शैलेजा जोगल,सुरेश ठमके हे असतील. पुणे विभागातून राजश्री आगाम, ज्ञानेश्वर चौतमल, जयपाल गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड येथून प्रवीण कोळआपटे, ठाणे येथून अरुण ठोंबरे, सचिन मोहिते (सांगली), आजीत कुंकूलोळ (सोलापूर) यांच्या नावांची घोषणा केली आहे. मराठवाड्यातून विजय चोरडिया (औरंगाबाद) चेतन कात्रे, (उस्मानाबाद) गजानन देशमुख (परभणी), हुंकार बनसोडे (उस्मानाबाद), सुकेशनी नाईकवाडे यांचा समावेश आहे. विदर्भातून आनंद आंबेकर (नागपूर), मंगेश खाटीक (गडचिरोली), संजय पडोळे, (चंद्रपूर), अरुण जैन (बुलडाणा), संजय राठोड (यवतमाळ), इरफान सय्यद (वाशीम), विनोद बोरे (अकोला) यांची निवड करण्यात आली आहे, तर खानदेशमधून सुरेश उज्जैनवाल (जळगाव) व भूषण अहिरे (धुळे) यांना कोअर टीममध्ये संधी देण्यात आली आहे. राज्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आजवर पत्रकारांचा विमा, आरोग्य समस्या, गृह योजना, पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळासाठी पाठपुरावा, तालुकास्तरावर पत्रकार भवनासाठी पुढाकार, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन हातभार लावणे. यासह विविध आघाड्यांवर संघटनेने मदतीची भूमिका ठेवली आहे. संघटनेच्या कार्याच्या जोरावरच देशभरात आज सदतीस हजारांवर सदस्य पत्रकार संघटनेशी जोडले गेले आहेत. आगामी काळात संघटनेचे नियोजन, पत्रकारांच्या समस्या कशा सोडवता येतील, यासाठी विचारविनिमय होणार आहे. थेट कृतिशील कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी कोअर टीमवर राहणार आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, मुख्य कार्यवाहक बालाजी मारगुडे यांनी या संपूर्ण कोअर टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.