संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी प्रतिनिधी १३ जून – नवी कामठी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन कंत्राटदाराच्या जेसीबीने क्षतीग्रस्त झाल्याने रविवारी लाखो लिटर पाणी आनंद नगर रामगड भागात तील अंतर्गत रस्त्यावर ओसंडून वाहत होते.
पाईपलाईन फुटल्याने भर उन्हाळ्यात रामगड आनंद नगर भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे जेसीबीने पाईपलाईन क्षतीग्रस्त झाली.परंतु कंत्राटदार अथवा कोणीही क्षती ग्रस्त पाईपलाईन पाहण्यासाठी आले नाही.
कामठी शहरात दोन झोन मध्ये पाणीपुरवठा होतो जुने कामठी शहर सकाळी सहा वाजता आणि नवीन कामठी शहर सायंकाळी चार वाजता पाणीपुरवठा करण्यात येतो सायंकाळी चार वाजता नवी कामठी भागातील आययुडीपी, कुंभारे कॉलनी, छत्रपती नगर, आनंद नगर, रामगड,गौतम नगर,सैलाब नगर, सुदर्शन नगर, आजाद नगर,लुंबिनी नगर या भागात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जेसीबीच्या कामामुळे लोहा कम्पनी जवळ फुटली मुख्य व्हॉल्व तिथेच असल्याने संपूर्ण पाणी आनंदनगर रामगढ परिसरात शिरले आणि उर्वरित भागात पाणीपुरवठा झाला नाही. आजही या भागात पाणीपुरवठा होण्याची शक्यता नसून नालीच्या बांधकामासाठी जेसीबीने पाईपलाईन फुटली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
परंतु या कामासाठी नगरपरिषदेची पूर्व परवानगी घेण्यात आली नाही असे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी सांगितले.
बॉक्स रामगड आनंद नगर भागात नाली बांधकामाचे कार्य होत असून या कामाचे नुकतेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजन केले परंतु नियोजनाअभावी जेसीबीने पाईपलाईन फुटली नाली बांधकामाचे काम पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर द्वारे होत असून त्यांनी पाईपलाईन फुटल्याने बद्दल हात वर केले आहे त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसला आहे याबाबत चौकशी करून कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात यावा तातडीने पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात यावे अशी मागणी भाजपा कामटी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी केली आहे.