इंदोरा ते दिघोरी दोन उड्डाणूपूलांची निर्मिती गडकरी यांच्या विभागाद्वारे केली जात आहे.ग्रेट नाग रोड येथील अशोक चौकाच्या उजव्या बाजूला जो पूल आहे त्या पूलाखाली नाग नदीच्या पात्रात चक्क दोन्ही बाजूला तीन पिल्लर्सचे बांधकाम करण्यात आले आहे!
मनपाच्या अधिकारी श्वेता बॅनर्जी यांना याबाबत विचारणा केली असता आम्ही परवागनी दिली नाही तर तो प्रस्ताव आम्ही पाटबंधारे विभागाकडे पाठवला असल्याचे त्या म्हणाल्या. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांनी सांगितले,असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलाच नाही तसा ही नाग नदी क्षेत्रातील बांधकाम हा आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. महामेट्रोने देखील सांगितले,फेज-२ च्या बांधकामात कुठेही महामेट्रो नदी पात्रात बांधकाम करीत नाही आहे,गडकरी यांच्या विभागातील मुख्य अधिकारी श्री.सिन्हा यांना कॉल केला असता,ते बांधकाम आमचेच असून आम्हाला मनपाने सर्व परवानग्या दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र,नदी पात्रात बांधकाम करण्याचे परवानगी पत्र ते नंतर सगळे डिटेल्स देतो असे सांगून फोन ठेऊन दिला!
मूळात,नदी पात्रात नियमानुसार कोणतेही बांधकाम करता येत नाही.नागपूर शहर हे एकमेव असे शहर आहे ज्या शहरात राज्याचे दोन महान नेते वास्तव्य करीत असून कोणत्याही प्रकल्पासाठी कोणत्याही शासकीय विभागाची त्यांना परवागनीच भासत नाही,असा त्याचा अर्थ होतो का?