२५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने २५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असुन सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

शहरात मुख्यतः दीड दिवस, ५ दिवस तसेच १० दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज भासते. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते. मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

३ फिरते विसर्जन कुंड –

गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ३ ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत.

स्पर्धा –

पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात यआली आहे यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपातर्फे देण्यात आलेल्या विषयांवर सजावट/देखावा करणे तसेच सार्वजनिक जागा सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असुन यात १ लक्ष, ७१ हजार,५१ हजार रुपयांची तसेच टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु बनविणाऱ्यास २१ हजार व २१ हजार रुपयांची तसेच इतर प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत.

एक खिडकी योजना – मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुद्धा सुरु करण्यात आली होती. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाद्वारे संयुक्तरीत्या सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

कृत्रिम तलाव स्थळ – एकूण – २५

१) झोन क्र. १ (कार्यालय) संजय गांधी मार्केट – २

२) साईबाबा मंदीर वडगाव – १

३)वडगाव पोलीस चौकी – १

४) दाताळा रोड,इरई नदी – २

५) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २

६) तुकुम एस टी वर्कशॉप – २

७) रामाळा तलाव – ४

८) छत्रपती शिवाजी चौक – २

९) गांधी चौक – १

१०) लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १

११) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १

१२) महाकाली प्रा.शाळा – १

१३) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – २

१४) झोन क्र. ३ (कार्यालय) – २

१५) लालपेठ ( हनुमान मंदिर ) जुनी बस्ती -१

निर्माल्य कलश – एकूण – १५

1) झोन क्र. १ (अ) – ५

2) झोन क्र. १ (ब) – १

3) झोन क्र. २ (अ) – ८

४) झोन क्र. ३ (ब) – १

५) झोन क्र. ३ (अ) – ३

६) झोन क्र. ३ (क) – २

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनात 3 तक्रारी प्राप्त

Mon Sep 9 , 2024
नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त झाल्या. उचित कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिले. भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले येथील नागरिकाची नैसर्गिक नाला व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोन मधील अतिक्रमणाबाबत दोन तक्रारींवर आज सुनावणी झाली. भंडारा जिल्ह्याच्या तक्रारीवर येत्या महिनाभरात कार्यवाही करून याबाबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com