नवी दिल्ली :- देशभरातील शाळांमध्ये ११ लाख १३ हजार शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असून त्यात ५ लाख ४७ हजार शौचालये मुलींसाठी तर १ लाख ५० हजार शौचालये सीडब्ल्यूएसएनसाठी बांधण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ते म्हणाले की, १५ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषनेनुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने देशातील सर्व शाळांच्ये शौचालयांच्या बांधकामासाठी सार्वजनिक उपक्रम आणि खासगी कारपोरेट यांच्या सहकार्याने स्वच्छ विद्यालय हा उपक्रम राबविला होता. त्यानुसार देशातील २ लाख ६१ हजार ४०० शाळात वर्षभरताच ४ लाख १० हजार ७९६ शौचालयाचे निर्माण करण्यात आले. तर जून २०२३ पर्यंत ११ लाख १३ हजार शौचालये तयार करण्यात आली आहे. यात विशेष आवश्क्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १.५० लाख शौचालयांचा समावेश आहे. यासाठी ४ हजार ५९० कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. शाळांच्या देखभालीसाठी वार्षिक १ लाख रुपयांचा खर्च देखील आवंटित करण्यात आला आहे.
युडायस २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार २५.५४ सरकारी शाळांमध्ये मुलांसाठी तर २७.४४ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शाळामध्ये सर्व सुविधा व त्याची देखरेख करण्यासाठी प्रबंध नावाचे पोर्टल तयार करण्यात आले. त्याचे स्थानिक प्रशासनासह राज्य व केंद्राकडून आढावा घेतला जात असल्याची माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
ग्रामीण भागातील सरकारी शाळामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहे व पेयजल उपलब्ध कावे यासाठी शिक्षण मंत्र्यांना आग्रह केला असून त्यानी त्याची दखल घेत अमलबजावणी करण्याचे आदेश संबधिताना देणार असल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली असल्याचे खासदार तुमाने यांनी सांगितले..