नागपूर :- धम्मज्योत चैरीटेबल ट्रस्ट दीक्षित नगर नागपूर तर्फे येथील समाजभवन मध्ये संविधान दिनानिमित्त “संविधान दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी न्यायधीश विजय धांडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. दिलीप अंबादे, ऍड. विजय जाँगळेकर,भास्कर राव, धर्मपाल वंजारी उपस्थित होते,तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऍड.बी. व्ही.भैसारे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर एल. आणि संचालन सागर डबरासे, तर आभार प्रदर्शन प्रमोद रत्नपारखी यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता धम्मज्योत चैरीटेबल ट्रस्ट तसेच उपासकांनी प्रयत्न केलेत.याप्रसंगी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले आणि माजी न्यायधीश विजय धांडे मार्गदर्शन परी म्हणाले की भारतीय संविधानातील उद्देशीका मध्ये असलेल्या समता,स्वातंत्र्य बँधूता आणि समानता तसेच धर्मनिरपरपेक्ष या तत्वाची सविस्तर माहिती दिली आणि जर संविधान समजायचे असेल बुध्दाचे विचार समजणे जरुरी आहे. भारतीय संविधान जगातील सर्वशेष्ठ संविधान आहे कारण देशात असंख्य जाती आणि धर्मातील लोक असून सुद्धा एकजुटीने राहतात.