संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दिनांक शनिवार २६ नोव्हेंबर २०२२ रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथे युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संविधान दिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते मोतीभाऊ इंगोले, माजी सरपंच माला इंगोले आणि उपस्थित अतिथी माधुरी सहारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अतिथी म्हणून सतीश भिवगडे, राजू गजभिये, केशव भीवगडे, राजेंद्र सहारे, अरुण भिवगडे, बेनिराम विघे, सचिन ढोले, नारायण पारेकर, श्रीकांत गीऱ्हे,आ अस्मिता बंसोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रस्ताविका वाचन अनिकेत इंगोले यांनी केले. तर, आयोजन अविनाश मेश्राम, अनिकेत इंगोले, आशिष सोनेकर, अंकित सहारे,आशिष गीऱ्हे, सुनील विघे, करण भिवगडे, हर्षल सहारे , शिवाजी वानखेडे, अजय चमेले, गोलू सहारे यांनी केले होते.