पारशिवनी : पारशिवनी राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कनिष्ठ कला महाविद्यालय, नवेगाव खैरी येथे शनिवार २६ नोव्हेंबरला संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनीराम धोटे यांचे मार्गदर्शनाखाली ‘माझं संविधान माझा सन्मान’ या विषयावर वक्तृत्व, निबंध लेखन, पोस्टर निर्मिती, रांगोळी अशा विविध स्पर्धा आयोजित करून बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदूळकर, प्रमुख पाहुणे प्रा. अरविंद दुनेदार, शिक्षिका तारा दलाल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. मोना वाघ, शिक्षक सतिश जुननकर, अमित मेश्राम यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. कर्मचारी लीलाधर तांदूळकर, रशीद शेख, मोरेश्वर दुनेदार प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी केले तर शिक्षक निलकंठ पचारे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी रांगोळी स्पर्धा माध्यमिक एकल गटातून – प्रथम विजेता – माही डायरे, समूह – प्रथम – दीपिका धुर्वे व वैष्णवी भारसकरे, प्राथमिक समूह – प्रथम – अक्षरा कळमकर व सेजल लोणारे,
निबंध स्पर्धा माध्यमिक गट – प्रथम – युवराज चक्रवर्ती, प्राथमिक गट – प्रथम – अंजली कळमकर, वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट – प्रथम – सेजल कळमकर, माध्यमिक गट – प्रथम – दिपाली वारकर,
पोस्टर स्पर्धा माध्यमिक गट – प्रथम – नम्रता सहारे, द्वितीय – प्रणय आरसे प्राथमिक गट – प्रथम – रीत तांदूळकर, द्वितीय – प्रिन्स गजभिये, प्रोत्साहन – कावेरी रेवडे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्तिक राऊत, कुश ढोरे, लव ढोरे, प्रीतम ढोरे, नैतिक ढोरे, यश डायरे, दर्शन बर्वे, नंदनी ढोंगे, समीक्षा रेवडे, खुशी ढोंगे, नंदनी ढोरे, संचिता भोयर, हर्षदा ठाकूर, माही डायरे व विद्यार्थ्यांनी अमूल्य योगदान दिले.