अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्हातील तिरोडा तालुक्यात दिनांक 26/11/2022 ते 6/12/2022 हा कालावधी समता पर्व म्हणून विविध उपक्रम राबवून संविधानाची जागृती घडविण्यासाठी साजरा करावयाचा आहे.
या अनुषंगानेच आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी ता तिरोडा जि गोंदिया येथे संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करून समता पर्वाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक डी जी आंबिलकर व प्रमुख अतिथी म्हणून गृहपाल पी एम घरडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेतील सहाय्यक शिक्षक .एच.जी. तुरक, ए. एम. शहारे ,पंकज रहांगडाले, केतन खोब्रागडे, एस.व्हि. सार्वे, पी. एम.धांडे इत्यादी शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम सरांडी गावामध्ये संविधान जागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये संविधान जागृती साठी विद्यार्थिनींनी संविधानाच्या गौरवार्थ घोषणा दिल्या. तद्नंतर शाळेतील सभागृहात सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले तसेच भारतीय संविधान उद्देशिकेची प्रतिमा व भारतीय संविधान ग्रंथ यांनासुद्धा अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले व संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्यात आली. यानंतर आंबिलकर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी दि 26/11/2008 ला मुंबई येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजू गजभिये हिने केले तर आभार प्रदर्शन तेजस्वी शेंडे हिने केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.