यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.सुरेंद्र भुयार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.