यवतमाळ :- नेहरु युवा केंद्र व बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन तसेच संविधान पदयात्रेचे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, उपप्राचार्य ताराचंद कंठाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय जोशी, प्रा.वैशाली मेश्राम, प्रा.हेमा गुल्हाने, रासेयोचे क्षेत्रीय अधिकारी प्रा.जयस्वाल त्याचप्रमाणे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.जोशी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तर उपप्राचार्य डॉ.ताराचंद कंठाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा.गजानन लांजेवार यांनी केले. त्यानंतर संविधान पदयात्रेला बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय येथून सुरुवात करण्यात आली.
पदयात्रा शिवाजी ग्राऊंड, आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा परिषद, अभ्यंकर कन्या विद्यालय, संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे संविधानाचे महत्व विशद केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन पदयात्रा बस स्टॅण्ड, दत्त चौक, माईंदे चौक, विर वामनराव चौक मार्गे महाविद्यालयात परत आली. पदयात्रेत युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन संविधानाबाबत जनजागृती केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा.वैशाली मेश्राम, प्रा.दत्तात्रय जोशी, प्रा.गजानन लांजेवार, प्रा.हेमा गुल्हाने, नेहरु युवा केंद्राचे सारंग मेश्राम, अनिल ढेंगे यांनी प्रयत्न करुन संविधान दिवस व पदयात्रा कार्यक्रम उत्सवात साजरा केला.