– दीक्षाभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
नागपूर :- काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुरुवात बुधवारी नागपुरातील पवित्र दीक्षाभूमी येथून केली आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांनी बुद्ध वंदना केली, ध्यान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर आयोजित संविधान सम्मान संमेलनात गेले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, राज्याचे प्रभारी रमेश चेंनिथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे तसेच वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधींच्या नागपुरातील संविधान सम्मान संमेलन, दीक्षाभूमी भेट आणि नागपुर दौऱ्याने शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची माहिती विकास ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
संविधान रक्षणासाठी राहुल गांधीच्या या भेटीने प्रत्येक प्रभावी भाषणातून शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उर्जा निर्माण झाली आहे. राहुल गांधींनी जात आधारित जनगणना नक्कीच होणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रक्रियेमुळे दलित, अन्य मागासवर्ग आणि आदिवासींसोबत होत असलेला अन्याय पुढे येणार असेही ते म्हणाले. जात जनगणनेमुळे सर्वकाही स्पष्ट होईल. प्रत्येकाला समजेल की, त्यांच्याकडे किती शक्ती आहे आणि त्यांची भूमिका काय आहे. तसेच राहुल गांधींनी हेही सांगितले की, आम्ही 50 टक्के आरक्षणाची भिंतही तोडून टाकू. नागपुरात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे उत्साहात स्वागत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
ढोल-ताशांच्या गजरात राहुल गांधीचे स्वागत
दीक्षाभूमी मार्ग ते संविधान सम्मान संमेलन स्थळापर्यंत सर्वत्र काँग्रेसचे झेंडे लावण्यात आले होते. याशिवाय राहुल गांधींचे लागलेले मोठमोठे कटआउट्स लक्ष वेधून घेत होते. राहुल गांधीच्या सभेसाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याने आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणारच हे दिसून आले. शहरातील विविध भागांतून काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी राहुल गांधीच्या भेटीसाठी आले होते. काहींनी आपल्या सोबत ढोल-ताशे आणले होते, ढोल- ताशांच्या गजरात राहुल गांधींचे विमानतळावर देखील भव्य स्वागत करण्यात आले.
बुथ पदाधिकाऱ्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद
पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या बुथ पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेतून जनतेशी संवाद साधला. बुधवारी सकाळी आणि सायंकाळी दोन सत्रात झालेल्या 351 बुथचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पश्चिम नागपूर मध्ये येणाऱ्या सर्व भागांत पदयात्रा केली. यावेळी काही ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंना विजय करण्याचा विश्वास दाखविला. तत्पूर्वी, प्रत्येक प्रभागातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभागाने पदयात्रा आकर्षणाचे केंद्र ठरले. ठाकरे यांनी पश्चिम नागपुराच्या इतिहासात सर्वाधिक प्रमाणात मूलभूत सुविधा कार्ये यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते पश्चिम नागपुरातील नागरिकांसाठी 24×7 उपलब्ध राहिले आहेत. यशाचे श्रेय नागरिकांना देणारे ते एकमेव आमदार आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्यांमुळे आणि सततच्या जनसंपर्कामुळे, नागरिकांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघातून दुसऱ्या कार्यकाळासाठी आमदार म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला आहे.