पो.हवालदार दुलीचंद बरवैया यांचा अपघातात मृत्यू

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सन 2016 पासून पोलीस स्टेशन तिरोडा येथे नेमणुकीस असलेले पो हवा दुलीचंद गोंदुजी बरवैया वय 49 वर्ष यांचा आज सकाळी 11: 15 मिनीटानी भंडारा येथे अपघाती मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

पो. हवालदार दुलीचंद गोंदुजी बरवैया हे पोलीस स्टेशन तिरोडा वरून कर्तव्य करिता मागील 3 महिन्या पासून बिरसी विमानतळ गोंदिया येथे होते. ते मूळ गावी भंडारा वरून कर्तव्य वर येत असतांना सु राजीव गांधी चौक भंडारा येथे त्यांच्या मोटर सायकल ला एस टी बस नी धडक मारली आहे. त्यामध्ये त्यांचा जागेवरच निधन झालेले आहे. त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच तिरोडा पोलिस स्टेशन येथे शोककळा पसरली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसून शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांना पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे- पोलीस उपायुक्त लोहित मथानी

Mon Jun 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 13:- कायदा हातात घेऊन शहरात कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नसून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस उपायुक्त लोहित मथानी यांनी कामठी पोलिसांच्यावतीने शहरात आयोजित पायदळ रूट मार्चच्या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केले रविवारला कामठी शहरातील एका तरुण-तरुणींनी धर्मगुरू बद्दल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com