संविधानाचा अपमान करणा-या काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अवमान केला – भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांचा हल्लाबोल

– भाजपाचे देशव्यापी संविधान गौरव अभियान

मुंबई :-भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप करणा-या काँग्रेसने अनेकवेळा घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आणीबाणी लादून, संविधानात बदल करून संविधानाचा गळा घोटला होता असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांनी रविवारी केला. भारतीय जनता पार्टीवर संविधान बदलाचा बिनबुडाचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेस आणि राहुल गांधी यांना नाही अशा शब्दांत पासवान यांनी टीकेची झोड उठवली. राज्यघटनेस 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे देशव्यापी संविधान गौरव अभियान सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शरद कांबळे, सरचिटणीस राहुल कांबळे, भटके विमुक्त आघाडी महामंत्री मनीष पतंगी, मुंबई सचिव राम शिंदे, द. मुंबई महामंत्री साक्षी दरेकर, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

यावेळी पासवान यांनी सांगितले की, काँग्रेसने कायमच दलित विरोधी, वंचित विरोधी, समता विरोधी भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाला राजकीय अस्त्र बनवत लोकसभा निवडणुकीपूर्वी हीन राजकारण करत फेक नरेटिव्ह तयार केले. मात्र फुले, शाहू , आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पारड्यात भरघोस मतदान करत फेक नरेटिव्ह धुळीस मिळवले. याबद्दल पासवान यांनी महाराष्ट्राच्या मतदारांचे आभार मानले. संविधान हा भाजपासाठी आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. यापुढे राहुल गांधींनी बाबासाहेबांचे नाव घेण्याआधी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केलेल्या महापापांचे स्मरण एकदा करावे आणि महाकुंभात सहभागी व्हावे असा खोचक सल्ला ही पासवान यांनी दिला.

सर्व घटकांच्या सक्षमीकरणासाठी भाजपाने प्रयत्नपूर्वक पावले उचलली तर काँग्रेसने वेळोवेळी आपला दलित विरोधी चेहरा दाखवला. सामाजिक न्यायाच्या वल्गना करणा-या काँग्रेसने वेळोवेळी हरियाणातील नेत्या कुमारी शैलजा, बाबू जगजीवनराम, सीताराम केसरी यांच्यासह दलित समाजातील अनेकांचा अपमान केला, असेही पासवान म्हणाले.

घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रती प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आणि जबाबदारी संदर्भात जनजागृती करण्यासाठी तळागाळातील जमसामान्यांपर्यंत ही मूल्ये पोहोचवण्याच्या उद्देशाने भाजपा तर्फे‘संविधान गौरव अभियान’ देशभर राबवण्यात येत आहे. यावेळी ठिकठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनही करण्यात येत आहे, अशी माहितीही पासवान यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यात 7 लाख 91 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ - पालकमंत्री संजय राठोड

Mon Jan 27 , 2025
– मोफत वीज योजनेतून 191 कोटींची बील माफी – युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे 11 कोटीचे विद्यावेतन – 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांना 189 कोटींचे वाटप – प्रजासत्ताकाचा वर्धापण दिन उत्साहात साजरा यवतमाळ :- मागील काळात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरु केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी योजना ठरली आहे. जिल्ह्यात 6 लाख 91 हजार महिलांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!