संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-अवंतिका लेकुरवाडे च्या गृहक्षेत्रातील कांग्रेसी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कामठी :- नागपूर जिल्हा परिषदचे महिला व बाल कल्याण सभापती तसेच कांग्रेसच्या पदाधिकारी प्रा. अवंतिका लेकुरवाडे यांनी कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात कांग्रेसचा झेंडा रोवण्यात यश गाठले असले तरी यांच्या या यशाला भाजप ने खिंडार देत त्यांच्याच गृहक्षेत्रातील तरोडी (बु )गावातील कांग्रेस चे काही कार्यकर्ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकासकार्यावर विश्वास ठेवत भाजपचे नागपूर जिल्हा ग्रा. महामंत्री अनिल निधान तसेच तालुकाध्यक्ष किशोर बेले यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केल्याने कांग्रेसच्या पदाधिकारी प्रा. अवंतिका लेकुरवाडे यांना भाजप चा दे धक्का देण्यात आला.
आज दिनांक 22/11/2022 ला जनसंपर्क कार्यालय कोराडी येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत व आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात भाजप महामंत्री नागपूर जिल्हा ग्रामीण अनिल निधान, भाजप मंत्री नागपूर जिल्हा ग्रामीण रमेश चिकटे, भाजपा तालुका अध्यक्ष कामठी ग्रामीण किशोर बेले, यांच्या उपस्थितीत तरोडी (बु) . येथील कार्यकर्ता बबनराव खुऴे, ग्रा.पं माजी उपसरपंच, बंधु चौधरी, माजी ग्रा.प सदस्य,गणेशभाऊ महल्ले सामाजिक कार्यकर्ता, अमोल महाल्ले ग्रा.पं उपसरपंच,शुभम महाल्ले सामाजिक कार्यकर्ता,परमेश्वर चिकटे सामाजिक कार्यकर्ता, रवींद्र महल्ले, सामाजिक कार्यकर्ता निलेश चिकटे, सामाजिक कार्यकर्ता यांनी भाजप पक्षात विश्ववास ठेवत प्रवेश केला.