नागपूर : काग्रेस नेते राहुल गांधींची ईडीनं चौकशी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची सलग तीन दिवस जवळपास 30 तास चौकशी करण्यात आली आहे . पुन्हा एकदा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर दुसरीकडे देशातील कॉंग्रेस पक्ष त्याविरोधात प्रचंड संतापला असून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला . यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपविरोधी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काँग्रेसच्या आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवरुन पुढे जाण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.