– शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेस च्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती
नागपूर :- गेल्या आठवड्यात पक्ष संघटनेचा नियम डावलून हुकुमशाही पद्धतीने युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना काँग्रेसच्या वरिष्ठ तसेच भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी झटका देत उपाध्यक्ष असलेले शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
अध्यक्ष कुणाल राऊत पक्षशिस्त न पाळता, स्व मालकीची प्रॉपर्टी असल्यागत संघटना चालवत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी देखील दिल्लीत पोहचल्या होत्या, अध्यक्ष म्हणून कुठलीही जबाबदारी पार न पाडता सक्रिय पदाधिकाऱ्यांना सूडबुद्धीने पदमुक्त करणाऱ्या राऊतानाच पक्षाने कार्य अहवाल सादर करायला सांगितल्याचे ऐकिवात आहे.
उपाध्यक्ष तन्वीर विद्रोही, सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे,अनुराग भोयर, मिथिलेश कन्हेरे,अक्षय हेटे, अभिषेक धवड यांच्यासारख्या पदमुक्त केलेल्या सर्व ६० पदाधिकाऱ्यांची दखल घेत मोठी चपराक अध्यक्ष कुणाल राऊत यांना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब व राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी दिली आहे.
कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेले शिवराज मोरे यांना आजच दिल्लीत बोलावून तातडीने पदभार स्वीकारण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला असून युवक काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याचे काम सोपवले आहे.शिवराज मोरे यांच्या नियुक्ती मुळे पदमुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना पुन्हा एकदा सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाल्या. यापुढे तरी संविधानिक पद्धतीने संघटना चालेल असा विश्वास व्यक्त व्यक्त करण्यात आला.