यवतमाळ :-यवतमाळ विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगूळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विदर्भ मास संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत समाजाच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. आमदार साहेबांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करण्याचे आश्वासन दिले.
संघटनेच्या वतीने त्यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या यशस्वी कार्यकालासाठी सहकार्याची ग्वाही देण्यात आली.