यूपीएससीत यश मिळविणार्‍या ऐश्वर्या उकेचा सत्कार

नागपूर :- संघ लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०२४ मध्ये नागरी सेवा परीक्षेत (यूपीएससी) यश संपादन केल्याबद्दल सम्यकनगर बँक कॉलनी निवासी ऐश्वर्या दादाराव उके हिचा मैत्री ज्येष्ठ नागरिक मंडळ, गार्डन ग्रुप व परिसरातील नागरिकांतर्पेâ सम्यक बुध्द विहार येथे पुष्प गुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी मंगल मैत्री परिवार, मैत्री बुध्द विहार, प्रभात कॉलनी, सम्यक बुध्द विहार, एस.सी.एस गर्ल्स हायस्कूल, रौरध हायस्कूल युथ क्लब, जॉगर बॉईज ग्रुपच्या सदस्यांनीही ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या.

शिक्षणातूनच मुल्यांतर घडून येते व क्रांतीचा उष:काल होतो. व्यवस्था परिवर्तन करण्याचे सामर्थ्य शिक्षणातच आहे. यश मिळविण्यासाठी खूनगाठ मनाशी बांधून जिद्दीने अभ्यास करून त्यांच्या कठोर परिश्रमाने, ध्येयाने यश संपादन करून ऐश्वर्या ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरली आहे. ऐश्वर्या हीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुध्द व सावित्रीबाई फुले यांना आपले आदर्श मानले आहे.

कार्यक्रमाला किशोर गजभिये (माजी ias अधिकारी) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मनोज सांगोळे उपस्थित होते. याप्रसंगी किशोर गजभिये यांनी मागासवर्गातील मुलांनी शिक्षण घेत राहावे, विद्वता मिळवावी, मोठ्या पदावर विराजमान व्हावे. यासाठी होणार्‍या परीक्षा द्याव्या लागतील, पण जातीव्यवस्था व दारिद्र्यालाही तोंड द्यावे लागते, यश खेचून आणण्याची जिद्द ऐश्वर्या हीने केली, तसेच प्रयत्न करीत राहावे, असे मत व्यक्त केले.

संचालन सिध्दार्थ गेडाम यांनी तर आभार गोपीचंद पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी दिवाकर साखरे, सूर्यभान गणेर, आनंद मेश्राम, पद्माकर हाडके यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

15 हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर, त्या सर्व सीबीएसई करा - बसपाची मागणी

Sun Jun 9 , 2024
नागपूर :-नवीन शिक्षण धोरणानुसार पटसंख्या कमी असल्याचे दाखवून राज्यातील 15 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन घेत आहे. “वन नेशन वन एज्युकेशन” या धोरणानुसार त्या सर्व शाळांमध्ये सीबीएसई चे शिक्षण देऊन लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य वाचवावे अशी मागणी नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम व महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वातील बसपा च्या शिष्टमंडळाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com