नागपूर :- नागपूर शहरातील विविध ठिकाणे, मैदान, चौक, बाजार तलाव अशा विविध ठिकाणांचा चेहरामोहरा बदलून या ठिकाणी नागरी सुविधांची निर्मिती करुन स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारणा-या अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना आर्कीटेक्टच्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात येत असलेल्या डिझाईन अँड बिल्ड स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात गुरूवारी (ता.४) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्यापुढेस सादरीकरण केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, मुख्य अभियंता राजू गायकवाड, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, विजय गुरूबक्षाणी, नागपूर@२०२५ चे निमिष सुतारीया, शिवकुमार राव, मल्हार देशपांडे, भावेश टहलरामानी, दिगंत शाह, सोनल पारेख, मुकुल कोगजे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संकल्पनांचे यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी कौतुक करीत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे देखील निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. अनेक संकल्पना उत्तम स्वरूपाच्या असून त्यामध्ये जागा वा अन्य बाबींच्या अडचणी निदर्शनास येताच संबंधित त्रुटी दूर करण्याबाबत कार्यवाही करणे तसेच संबंधित संकल्पना इतर ठिकाणी अंमलात आणणे शक्य असल्यास त्या दृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश आयुक्त तथा प्रशासक यांनी दिले. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर @२०२५ च्या वतीने घेण्यात येत असलेल्या डिझाईन अँड बिल्ड स्पर्धेमध्ये सहभागी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्यूकेशन अँड आर्कीटेक्चरल स्टडिज (आयडीईएएस), प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर आणि श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर येथील विद्यार्थ्यांच्या १५ चमूंनी आयुक्तांपुढे त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण दिले.
या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
आयडीईएएस
– अक्षा पौनीकर, नाकीया नाझमी, मनुश्री घिये
– इब्राहिम हुसैन, केतकी होळे, विनम्र गुप्ता, हर्ष गोस्वामी
– रेणूका गुप्ता, साक्षी चौधरी, भावी चंद्राकर, वृषाली जानवे, केतकी राजंदेकर
– अवंती जीवतोडे, वैष्णवी बंग, मोहित धकाते, तुलीका धांडोले, दिशा तालडा
– निखिल साहु, अंकिता परियानी, मोहित अंदानी, विशाल सोनी, आयुषी जैन
– साहिल बोंदाडे, प्रांजल धाकुलकर, खुशबू जैन
– लक्ष्मी महाकाळकर, शेजल यादव, प्रतिक गाडके, आयुष बावने
– प्रथम गिगनानी
प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर
– देवांश चव्हाण, आकांक्षा काळे, अनिषा संगमनेरकर, चैतन्य मुंगीलवार
– रिदम गोबरे, सत्यजीत हेडाउ, भक्ती प्रतापवार
– फिरदौस शेख, हिमांशू हरीदास, गार्गी शिंदे
– रोहित असाटी, चिन्मय जावरकर, पूनम घोंगे, अर्चित धुमाळ
– अमिता सिल्ही, अनघा खुणे, शितल डेकाटे
श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर
– सौम्या पांडे, आचल अडकिने, रचना शेरेकर