‘स्वप्ननिकेतन’साठी संगणकीय सोडत (लॉटरी) २१ ऑक्टोबरला

– ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील सदनिकांसाठी शनिवारी २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संगणकीय सोडत (लॉटरी) होणार आहे. शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत प्रक्रियेला सुरूवात होईल. ज्या नागरिकांनी विहित मुदतीत नोंदणी शुल्कासह अर्ज सादर केले आहेत, अशा सर्व नागरिकांनी संगणकीय सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘स्वप्ननिकेतन’ हे ४८० सदनिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK सदनिका आहेत. सदनिकेची एकूण बांधकामाची किंमत रु. ११,५१,८४५ (अंदाजीत) एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे रु. २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य रु. ९,०१,८४५ रूपये आहे. या व्यतीरिक्त इलेक्ट्रीक मिटर, जीएसटी, रजीस्ट्री किंमत, स्टॅम्प डयुटी, सोसायटी डीपॉझीट, ॲग्रीमेंन्ट सेल डीड करीता अतिरिक्त शुल्क अदा करावे लागेल. सदनिका खरेदी करण्याकरिता ऑनलाईन माध्यमातून मनपाच्या पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्रकल्पातील ४८० सदनिकांमध्ये ५० टक्के अर्थात २४० सदनिका अराखीव असून १३ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमाती, ३० टक्के इतर मागास प्रवर्ग आणि ५ टक्के –समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा करणा-या पंपला लागणा-रा वीज निर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर उर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, पर्जन्य जलसिंचन प्रकल्पाची सुविधा, जलनि:स्सारण इ. सुविधाचा समावेश आहे.

ऑनलाईन लॉटरी नंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा प्रदेश बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठ पदाधिकाऱ्यांची घोषणा

Fri Oct 20 , 2023
मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश, बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठ च्या प्रदेश संयोजिका डॉ.शुभा फरांदे – पाध्ये यांनी प्रकोष्ठच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.प्रदेश सहसंयोजक पदी विनय त्रिपाठी, नीलिमा ताटेकर, अल्पा अग्रवाल आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदेश समन्वयक म्हणून शैलेश घेडीया, मृणालिनी बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सुशील ओगले, अंजली साळवी, पायल कबरे, डॉ. तेजस्विनी गोळे, स्वरदा कुलकर्णी, डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com